पुरंदर रिपोर्टर लाईव्ह
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
माळेगाव क्रिडासंकुल माळेगाव, ता.बारामती, येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत एस .डी सह्याद्री पब्लिक स्कूल & ज्यु.कॉलेज ( C.B.S.E) वाघळवाडीमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
यामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील मुलींनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला होता त्यापैकी १०० मी.धावणे : प्रथम क्रमांक , ६०० मी. धावणे : प्रथम क्रमांक , ४ × १०० मी. रिले : प्रथम क्रमांक (मुले व मुली) इ.प्रकारात यश संपादन केले आहे.
१) अनुजा दीपेश वरठा: १०० मी.धावणे : प्रथम क्रमांक ( १४ वर्ष वयोगट )
२) संकष्टी सुभाष भालेकर: ६०० मी.धावणे : प्रथम क्रमांक ( १४ वर्ष वयोगट )
३) मेघा रमेश निसकटे: १०० मी.धावणे : प्रथम क्रमांक (१७ वर्ष वयोगट)
रिले ४ × १०० मी :(मुली)
प्रथम क्रमांक (१४ वर्ष वयोगट)
१)संकष्टी सुभाष भालेकर
२) रचना रवींद्र दुमडा
३)अनुजा दीपेश वरठा
४) संजना लक्ष्मण मुरकुटे
रिले : ४ × १०० मी : (मुले ) : प्रथम क्रमांक (१७ वर्ष वयोगट)
१)सुमित एकनाथ सानकरे
२)सुरज संजय काळे
३) राम सुरेश मोरे
४)श्याम सुरेश मोरे
वरील सर्व विद्यार्थ्यांची निवड पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे.
विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी मुलांना नेहमीच प्रेरित करणारे संस्थेचे अध्यक्ष अजिंक्य सावंत ,प्राचार्य अजित वाघमारे, रोहिणी सावंत , शाळेचे क्रीड़ा शिक्षक डोंबाळे सर, दणाणे सर,मंडले सर व शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विजयी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढे होणाऱ्या जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

0 Comments